अनंत कणेकरांवर कम्यूनिस्ट विचारांचा प्रभाव होता
तेव्हाची गोष्ट. अनंत कणेकर त्यांच्या सहकाय्रा सोबत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेले होते.
त्यांचे सर्व सहकारी नास्तिक होते. सहकाय्रांना
वाटले की मंदिराचे सौंदर्य पाहायला कणेकर इथे आले असावेत. कणेकरांनी विठ्ठला समोर डोके टेकवून नमस्कार केला. कणेकरांच्या सहकायारांना त्यांचे हे कृत्य आवडले नाही. न राहूल त्यांनी कणेकरांना विचारले "आपण तर नास्तिक आहोत. मग आपण देवाला नमस्कार करणे योग्य आहे का? यातून लोकांसमोर कोणता संदेश जातो?". कणेकर स्मित करत म्हणाले "खरं तर मला माहित नाही या जगात देव आहे की नाही. देवाला आपण कुणीच पाहिलेलं नाही आणि म्हणूनच या तर्कानुसार या जगात देव नाही असंच आपण म्हणतो. माझा देवावर विश्वास नाही. परंतु माझा ज्ञानेश्वरांवर विश्वास आहे, माझा तुकोबांवर विश्वास आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम इथे येऊन डोकं टेकवत होते, याचा अर्थ इथे काहीतरी नक्कीच आहे. काय आहे हे मात्र मी सांगू शकत नाही. परंतु आपण सर्व ज्ञानेश्वर आणि तुकोबांपेक्षा नक्कीच मोठे नाही. एवढं मला पक्क माहिती आहे "♍